सिंधुदुर्ग जिल्ह्यात ड्रोन उड्डाणांवर 3 जूनपर्यंत बंदी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ड्रोन उड्डाणांवर तीन जूनपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर ड्रोन उड्डाणांवर बंदी आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ड्रोन उड्डाणांवर 3 जूनपर्यंत बंदी

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ड्रोन उड्डाणांवर तीन जूनपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर ड्रोन उड्डाणांवर बंदी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी ड्रोन उड्डाणांवर 3 जूनपर्यंत बंदी असल्याचे निर्देश जारी केले आहेत. 

भारतीय सैन्याने नुकत्याच केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ड्रोन (मानवरहित हवाई यंत्र) उड्डाणांवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. ही बंदी 3 जून 2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहील. पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या निर्देशानुसार, काही असामाजिक तत्वांकडून ड्रोनचा वापर कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करण्यासाठी किंवा संवेदनशील तसेच पर्यटन स्थळांची रेकी करण्यासाठी केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हेही वाचा : पवारांमुळे मोदींची अटक टळली; नरकातला स्वर्ग पुस्तकातून राऊतांचे खळबळजनक दावे

या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोणत्याही अप्रिय घटनेला प्रतिबंध घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला  आहे. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, अत्यावश्यक कारणांसाठी ड्रोन वापरायची आवश्यकता असल्यास, संबंधित व्यक्तीला सिंधुदुर्गच्या पोलिस अधीक्षकांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असेल. परवानगीशिवाय ड्रोन उडवल्यास, भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ड्रोन उड्डाणांवर 3 जूनपर्यंत बंदी करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number