अवेळी ‘ग्रीन’ टी पिणे धोकादायक

चहा म्हणजे सगळ्यांच्याच जिव्हाळ्याची गोष्ट पण त्यातही ग्रीन टी हा आरोग्यासाठी खजिना मानला जातो, बरेच आरोग्य तज्ञ सुदृढ आरोग्यासाठी ग्रीन टी पिण्याचा सल्ला देतात. पण प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे असतात तसेच तोटे देखील असतात.असंच काहीसं या ग्रीन टीच्या बाबतीत सुद्धा आहे. ग्रीन टी पिण्याची पण एक योग्य वेळ असते अथवाआरोग्याबाबत गडबड होऊ शकते. तर पाहूया […]

अवेळी  ‘ग्रीन’ टी पिणे धोकादायक

चहा म्हणजे सगळ्यांच्याच जिव्हाळ्याची गोष्ट पण त्यातही ग्रीन टी हा आरोग्यासाठी खजिना मानला जातो, बरेच आरोग्य तज्ञ सुदृढ आरोग्यासाठी ग्रीन टी पिण्याचा सल्ला देतात. पण प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे असतात तसेच तोटे देखील असतात.असंच काहीसं या ग्रीन टीच्या बाबतीत सुद्धा आहे. ग्रीन टी पिण्याची पण एक योग्य वेळ असते अथवाआरोग्याबाबत गडबड होऊ शकते. तर पाहूया ग्रीन टीचे फायदे आणि ते पिण्याची योग्य वेळ

ग्रीन टी पिण्याचे फायदे

  • कॅन्सर सारख्या भयंकर आजारापासून दूर राहण्यासाठी ग्रीन टी जरूर प्या. यात उपस्थित असलेले पॉलिफेनॉल्स ट्यूमर आणि कर्करोगाच्या पेशी टाळण्यास मदत करतात.
  • नियमित ग्रीन टी प्यायल्याने रक्तातील बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे रक्तभिसरण सुरळीत होते आणि हृदयरोगाचा धोका टळतो.
  • खराब त्वचेवर पेशींची भरपाई करण्यासाठी ग्रीन टी पिणे फायदेशीर मानले जाते, त्यामुळे त्वचेच्या संसर्गापासून भरपूर संरक्षण होते आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.
  • ग्रीन टीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, वजन कमी करण्यास, चयापचय वाढविण्यास तसेच शरीरातील चरबी हळूहळू कमी करण्यास मदत करते. व्यायामापूर्वी ते पिणे चांगले.

ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती?
खाण्याच्या एक दिड तास आधी ग्रीन टी पिणे फायदेशीर मानले जाते, कारण त्यात टॅनिन असतात. खाल्ल्यानंतर लगेच ग्रीन टी चे सेवन केल्याने मळमळ, बद्धकोष्ठता आणि पोटदुखीची तक्रार होऊ शकते. ग्रीन टी कधीही रिकाम्या पोटी पिऊ नये. झोपण्यापूर्वी ग्रीन टी पिऊ नये कारण ते प्यायल्याने डिहायड्रेशन होऊ शकते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number