आणखी ३४ मंदिरात लागू होणार वस्त्रसंहिता

जळगाव जिल्ह्यातील ३४ मंदिरांमध्ये येत्या आठ दिवसांत वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला आहे. टप्प्याटप्प्याने अन्य मंदिरात देखील तीन महिन्यांमध्ये वस्त्रसंहिता लागू होईल असेही मंदिर महासंघाचे समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध पद्मालय मंदिर, पारोळ्यातील बालाजी मंदिर देवस्थान व सातपुडा निवासिनी मनुदेवी मंदिरांसह अन्य मंदिरांचा यात समावेश आहे. नागपूर, अमरावती, […]

आणखी ३४ मंदिरात लागू होणार वस्त्रसंहिता

जळगाव जिल्ह्यातील ३४ मंदिरांमध्ये येत्या आठ दिवसांत वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला आहे. टप्प्याटप्प्याने अन्य मंदिरात देखील तीन महिन्यांमध्ये वस्त्रसंहिता लागू होईल असेही मंदिर महासंघाचे समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध पद्मालय मंदिर, पारोळ्यातील बालाजी मंदिर देवस्थान व सातपुडा निवासिनी मनुदेवी मंदिरांसह अन्य मंदिरांचा यात समावेश आहे.

नागपूर, अमरावती, अहिल्यानगर (अहमदनगर) यांनंतर आता जळगाव जिल्ह्यातील अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांच्या उपस्थितीत ३१ मे या दिवशी झालेल्या बैठकीनंतर जळगावमधील यावल येथील सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिर, पारोळा येथील प्रसिद्ध श्री बालाजी मंदिर यांच्यासह अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला. त्यासंदर्भात यापूर्वीच वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेल्या श्री ओंकारेश्‍वर मंदिर येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने ५ जून या दिवशी पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये श्री बालाजी मंदिर (पारोळा), श्री मनुदेवी मंदिर (यावल), श्री पद्मालय देवस्थान (एरंडोल) या मंदिरांसह ३० हून अधिक मंदिरांत येत्या आठवड्यात, तर जळगाव जिल्ह्यातील अन्य मंदिरांमध्ये येत्या ३ मासांत वस्त्रसंहिता लागू करण्याचे घोषित करण्यात आले. ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी या वेळी सर्वांना संबोधित केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number