अहमदनगर शहरातील १६ मंदिरात वस्त्रसंहिता

अहमदनगर, ४ जून २०२३, प्रतिनिधी :  मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य जपण्यासाठी नागपूर, अमरावतीबरोबरच आता अहिल्यानगर येथील अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संहितेचे पालन भाविकांनी करावे, असे आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी पत्रकार पषिदेत केले. अहिल्यानगर येथे ७ मे २०२३ रोजी झालेल्या प्रांतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनामध्ये याविषयी ठराव संमत झाला […]

अहमदनगर शहरातील १६ मंदिरात वस्त्रसंहिता

अहमदनगर, ४ जून २०२३, प्रतिनिधी :  मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य जपण्यासाठी नागपूर, अमरावतीबरोबरच आता अहिल्यानगर येथील अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संहितेचे पालन भाविकांनी करावे, असे आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी पत्रकार पषिदेत केले.

अहिल्यानगर येथे ७ मे २०२३ रोजी झालेल्या प्रांतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनामध्ये याविषयी ठराव संमत झाला होता. अहमदनगर शहरासह परिसरातील श्री तुळजाभवानी माता मंदिर, श्री मारुती मंदिर, शनी मारुती मंदिर, शनिमारुती मंदिर, तुळजाभवानी मंदिर, श्रीगणेश राधाकृष्ण मंदिर, श्रीराम मंदिर पवननगर, श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर या मंदिराबरोबरच संपूर्ण अहिल्यानगरातील मंदिरामध्ये येत्या 2 महिन्यांत संहिता लागू करण्यात येणार आहे.

याचबरोबर सर्व मंदिरात वस्त्रसंहितेच फलक देखील लावण्यात येणार आहेत. भाविकांनी अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून देवदर्शनासाठी येऊ नये असे आवाहनही करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number