कुणकेश्वर मंदिरात वस्त्रसंहिता लागू

कुणकेश्वर, २२ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात प्रवेशासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिराच्या प्रवेशद्वारावर भाविकांसाठी सूचना फलक लावण्यात आले आहेत. भारतीय संस्कृती, परंपरांचे रक्षण, संवर्धन आणि जतन करण्याबरोबरच मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. वस्त्रसंहितेचे पालन करण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून भाविकांना शाल, […]

कुणकेश्वर मंदिरात वस्त्रसंहिता लागू

कुणकेश्वर, २२ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात प्रवेशासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिराच्या प्रवेशद्वारावर भाविकांसाठी सूचना फलक लावण्यात आले आहेत. भारतीय संस्कृती, परंपरांचे रक्षण, संवर्धन आणि जतन करण्याबरोबरच मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

वस्त्रसंहितेचे पालन करण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून भाविकांना शाल, उपरणे, पंचा, ओढणी आदी वस्त्रे मोफत देण्यात येतील. दर्शनानंतर ती वस्त्रे परत घेतली जातील. भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number