अमरावती महापालिकेचा प्रारूप आराखडा जाहीर

अमरावतीमध्ये होणाऱ्या महानगर पालिकेचा प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे. अमरावती महापालिकेमध्ये ११ नगरसेवक वाढणार असून २ मार्चला अंतिम आराखडा सादर केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे, ३३ प्रभागाचेही स्वतंत्र नकाशे आणि पूर्ण अमरावती शहराचा एकत्रित नकाशा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयावर नागरिकांना आक्षेप असल्यास येत्या १४ फेब्रुवारीपर्यंत महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील […]

अमरावती महापालिकेचा प्रारूप आराखडा जाहीर

अमरावतीमध्ये होणाऱ्या महानगर पालिकेचा प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे. अमरावती महापालिकेमध्ये ११ नगरसेवक वाढणार असून २ मार्चला अंतिम आराखडा सादर केला जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे, ३३ प्रभागाचेही स्वतंत्र नकाशे आणि पूर्ण अमरावती शहराचा एकत्रित नकाशा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयावर नागरिकांना आक्षेप असल्यास येत्या १४ फेब्रुवारीपर्यंत महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील निवडणूक विभागात सांगायचे आहे, असे अमरावती महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार, २ मार्च रोजी या निर्णयावर सुनावणी घेऊन अंतिम आराखडा सादर केला जाईल. अमरावतीमध्ये एकूण ९८ नगरसेवक आहेत. यामध्ये ११ नगरसेवक वाढले असून अमरावतीमध्ये ३ नगरसेवकांचा प्रभाग राहणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number