ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ गंगाधर पानतावणे यांचं निधन

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ गंगाधर पानतावणे यांचं सोमवारी मध्यरात्री दीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर औरंगाबादमधील एमआयटी रुग्णालयात उपचार सुरू होते. ते 81 वर्षांचे होते. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल गंगाधर पानतावणे यांना गेल्याच आठवड्यात ‘पद्मश्री’ पुरस्करानं गौरवण्यात आलं होतं. डॉ. पानतावणे हे ‘अस्मितादर्श’ चळवळीचे जनक आणि पहिल्या विश्व मराठी साहित्य […]

ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ गंगाधर पानतावणे यांचं निधन

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ गंगाधर पानतावणे यांचं सोमवारी मध्यरात्री दीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर औरंगाबादमधील एमआयटी रुग्णालयात उपचार सुरू होते. ते 81 वर्षांचे होते.

साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल गंगाधर पानतावणे यांना गेल्याच आठवड्यात ‘पद्मश्री’ पुरस्करानं गौरवण्यात आलं होतं. डॉ. पानतावणे हे ‘अस्मितादर्श’ चळवळीचे जनक आणि पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. लेखन करण्यासोबतच ते समीक्षक आणि संपादकही होते. गंगाधर पानतावणे यांचा जन्म 28 जून 1937 साली नागपुरमध्ये झाला. त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नागपुरात झालं. एमएची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातून पीएचडी मिळवली.

दलित साहित्य आणि दलित चळवळ या विषयांत गंगाधर पानतावणे यांचं महत्वपूर्ण योगदान होतं. ‘धम्म चर्चा`, `मूल्यवेध’, ‘मूकनायक’, ‘विद्रोहाचे पाणी पेटले आहे’, ‘दलित वैचारिक वाड्मय’, साहित्य, प्रकृती आणि प्रवृत्ती’, ‘साहित्य शोध आणि संवाद’, ‘वादळाचे वंशज’, हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. आज संध्याकाळी पाणतावणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. औरंगाबादमधील राहत्या घरी त्याचं पार्थिव अत्यं दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number