आरेत कारशेड नको – अमित ठाकरे

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत मेट्रो-३ कारशेडच्या मुद्द्यांवर चर्चा केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकाळात मेट्रो-३ कारशेड आरे येथून कांजुरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा निर्णय मागे घेतला असून मेट्रोचे कारशेड आरेमध्येच होण्याचे निर्देश […]

आरेत कारशेड नको – अमित ठाकरे

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत मेट्रो-३ कारशेडच्या मुद्द्यांवर चर्चा केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकाळात मेट्रो-३ कारशेड आरे येथून कांजुरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा निर्णय मागे घेतला असून मेट्रोचे कारशेड आरेमध्येच होण्याचे निर्देश दिले आहेत.

शिंदे सरकारने दिलेल्या मेट्रो कारशेडबाबतच्या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विरोध दर्शवला. त्यानंतर आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी आरे कारशेडबाबत फेसबुक पोस्ट लिहित विरोध दर्शवला आहे. आरेमध्ये कारशेड नको, अशी ठाम भूमिका अमित ठाकरे यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

अमित ठाकरे यांनी लिहिले की, ‘मेट्रो कारशेड आरेतच करण्याच्या नव्या सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळं माझ्यासारख्या अनेक पर्यावरणप्रेमींना धक्का बसला आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुण-तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड केलं होतं’, याची आठवण अमित ठाकरे यांनी करून दिली आहे.

‘आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. आपलं पर्यावरण उद्ध्वस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचं भान सर्व राजकारण्यांनी बाळगायला हवं. नवे मुख्यमंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील मेट्रो कारशेड बाबतच्या आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा’, अशी विनंतीही अमित यांनी केली आहे.

दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही आरे कारशेडला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आरे कारशेडबाबत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे एकमत झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number