‘जिवंतपणी माझे फोटो वापरु नका’

मुंबई, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यामधला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अजित पवार यांच्या गटाकडून वापरण्यात येत असलेल्या शरद पवारांच्या फोटोवर आता खुद्द शरद पवारांनीच आक्षेप घेतला आहे. तसंच आपला फोटो वापरू नये, असा सज्जड इशाराही शरद पवारांनी दिला आहे. अजित पवारांच्या गटाकडून वापरण्यात येणाऱ्या पोस्टरवर […]

‘जिवंतपणी माझे फोटो वापरु नका’

मुंबई, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यामधला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अजित पवार यांच्या गटाकडून वापरण्यात येत असलेल्या शरद पवारांच्या फोटोवर आता खुद्द शरद पवारांनीच आक्षेप घेतला आहे. तसंच आपला फोटो वापरू नये, असा सज्जड इशाराही शरद पवारांनी दिला आहे. अजित पवारांच्या गटाकडून वापरण्यात येणाऱ्या पोस्टरवर शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार म्हणाले…
‘माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा. ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला, ज्यांच्याशी माझा आता वैचारिक मतभेद आहे. जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माशा अधिकार आहे. त्यामुळे मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, त्या पक्षाने माझा फोटो वापरवा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये,’

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर आता दोन्ही गटांकडून एकमेकांवर कारवाईला सुरूवात झाली आहे. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर अजित पवारांनी आमदारांच्या सह्या घेऊन स्वत:ची गटनेते म्हणून निवड केली आणि मग राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number