‘शरद पवारांना विठ्ठल म्हणू नका’

मुंबई , ८ जुलै २०२३, प्रतिनिधी : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या घडमोडी घडताना पाहायला मिळत आहेत. पक्षात अजित पवार आणि शरद पवार गट असे दोन गट पडले आहेत. त्यातच अजित पवार गटाकडून ‘साहेब आमचे विठ्ठल आहेत. पण त्या विठ्ठलाला ‘बडव्यांनी घेरलं आहे’, असे विधान करण्यात आले. यावरून आता नव्या वादाची ठिणगी […]

‘शरद पवारांना विठ्ठल म्हणू नका’

मुंबई , ८ जुलै २०२३, प्रतिनिधी : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या घडमोडी घडताना पाहायला मिळत आहेत. पक्षात अजित पवार आणि शरद पवार गट असे दोन गट पडले आहेत. त्यातच अजित पवार गटाकडून ‘साहेब आमचे विठ्ठल आहेत. पण त्या विठ्ठलाला ‘बडव्यांनी घेरलं आहे’, असे विधान करण्यात आले. यावरून आता नव्या वादाची ठिणगी पडली आहे.

भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून अजित पवार गटाला याबद्दल थेट इशारा देण्यात आला आहे. “शरद पवार यांना विठ्ठल म्हणणं तात्काळ थांबवा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू ” असा इशारा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी दिला आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची उपमा एखाद्या राजकीय नेत्याला देणं शोभतं का? म्हणून शरद पवारांना विठ्ठल संबोधणं तात्काळ थांबवा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून तुमच्या विरोधात आंदोलनं करावी लागतील, असे तुषार भोसले म्हणाले आहेत.

अजित पवार गटाच्या मुंबईत झालेल्या पहिल्याच सभेत अजित पवार गटाचे नेते छगन भुजभळ यांनी यांसंबंधी विधान केले होते. साहेब आमचे विठ्ठल आहेत. पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. साहेब त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशिर्वाद द्यायला या अशी विनंती भुजबळांनी या सभेत बोलताना शरद पवारांना केली होती. यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number