Donald Trump: ‘आधी चुकायचं आणि मग झुकायचं’; भारताविरोधातील ‘त्या’ विधानावर ट्रम्प यांची सारवासारव, म्हणाले ‘भारत हा…’

वाद अधिक चिघळल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने स्पष्टीकरणही देण्यात आले.

Donald Trump: ‘आधी चुकायचं आणि मग झुकायचं’; भारताविरोधातील ‘त्या’ विधानावर ट्रम्प यांची सारवासारव, म्हणाले ‘भारत हा…’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ट्रम्प यांनी एका संभाषणाचा ट्रान्सक्रिप्ट शेअर करताना भारत, चीन आणि काही इतर देशांसाठी ‘नरक’ (हेलहोल) असा उल्लेख केल्याचा आरोप आहे. या विधानानंतर भारताने अधिकृतपणे नाराजी व्यक्त केली असून, या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालय चे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. “अशा प्रकारची भाषा योग्य नाही आणि ती भारत-अमेरिका संबंधांचे वास्तव प्रतिबिंबित करत नाही,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे नमूद केले की, हे विधान अपुरी माहिती आणि कमी समजुतीतून करण्यात आले असल्याचे दिसते.

वाद अधिक चिघळल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने स्पष्टीकरणही देण्यात आले. नवी दिल्लीतील अमेरिकी दूतावास मार्फत जारी केलेल्या निवेदनात ट्रम्प यांनी भारताला “महान देश” म्हटल्याचे सांगण्यात आले. तसेच भारताशी आपले चांगले संबंध असल्याचेही त्यांनी अधोरेखित केल्याचे दूतावासाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Weather Update: पुढील काही तास महत्त्वाचे! काही भागात उष्णतेचा तडाखा तर कुठे वादळीवाऱ्यासह गारपिटीचा धोका, प्रशासन सज्ज

हा संपूर्ण वाद एका कन्झर्व्हेटिव्ह राजकीय चर्चासत्राशी संबंधित ट्रान्सक्रिप्टमधून उभा राहिला आहे. अमेरिकन रेडिओ होस्ट मायकल सॅव्हेज यांच्या कार्यक्रमात अमेरिकेच्या जन्माधारित नागरिकत्व धोरणावर चर्चा सुरू होती. या धोरणानुसार अमेरिकेत जन्मलेल्या व्यक्तीस आपोआप नागरिकत्व मिळते, भले त्याचे पालक कोणत्याही देशाचे असोत. याच संदर्भात काही लोक गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात अमेरिकेत येतात, असा दावा करताना भारत आणि चीनसाठी वादग्रस्त शब्दांचा वापर करण्यात आला.

या वक्तव्यावर भारतातील राजकीय पक्षांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने या विधानाचा निषेध करत याला देशाचा अपमान म्हटले आहे. पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा मुद्दा अमेरिकेसमोर ठामपणे मांडावा, अशी मागणी केली आहे.

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनीही ट्रम्प यांच्या विधानावर जोरदार टीका केली. “भारताबद्दल अशा प्रकारचे शब्द वापरण्याचा अधिकार कोणालाही नाही. हा प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे,” असे त्या म्हणाल्या. एकूणच, या प्रकरणामुळे भारत-अमेरिका संबंधांबाबत संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, पुढील काळात या विषयावर अधिक चर्चा होण्याची शक्यता आहे.  

हेही वाचा: Navi Mumbai Cab Fare: रिक्षा, कॅबपेक्षा विमानप्रवास परवडला म्हणायची वेळ! नवी मुंबई विमानतळावरून घर गाठण्यासाठी मोजावे लागतायत तब्बल 6000 रूपये, आणि…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number