जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली
डोंबिवलीत बहिणीशी चॅटिंग करीत असल्याचा राग मनात ठेवून भावाने मित्राच्या मदतीने तरुणावर हल्ला केलाय. डोंबिवलीच्या आजडे गावात ही घटना घडलीय.
मंदार तेली असं जखमी तरुणाचं नाव असून आरोपीने मंदारच्या पोटावर चाकूने वार केल्याने मंदारला एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय
चॅटिंग करणाऱ्या युवकावर बहिणीच्या भावाने मित्राच्या मदतीने सायंकाळी साडेसातच्या सुमारास आजडे गावात चाकूने पोटावर हल्ला करीत जखमी अवस्थेत आपल्या गाडीवर बसवून हॉस्पिटलच्या गेट वर टाकले.