डोबिंवलीत डेरेदार वृक्ष भरपावसातही अचानक सुकली

जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली   श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. सध्या सर्वत्र हिरवळ दिसून येत आहे. मात्र, श्रावणात डोंबिवलीच्या पेंढारकर कॉलेज परिसरातील मोठी 8 झाडं अचानक सुकली आहेत.   8 ते 10 दिवसांपूर्वी हिरवीगार बहरलेली झाडं अचानक वाळली आहेत. आजूबाजूच्या परिसरात हिरवाईने नटलेली अनेक डेरेदार वृक्ष दिसत असताना नेमकी आठ वृक्षचं कशी सुकली असा सवाल आणि […]

डोबिंवलीत डेरेदार वृक्ष भरपावसातही अचानक सुकली

जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली

 

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. सध्या सर्वत्र हिरवळ दिसून येत आहे. मात्र, श्रावणात डोंबिवलीच्या पेंढारकर कॉलेज परिसरातील मोठी 8 झाडं अचानक

सुकली आहेत.

 

8 ते 10 दिवसांपूर्वी हिरवीगार बहरलेली झाडं अचानक वाळली आहेत. आजूबाजूच्या परिसरात हिरवाईने नटलेली अनेक डेरेदार वृक्ष दिसत असताना नेमकी आठ वृक्षचं

कशी सुकली असा सवाल आणि चिंता पर्यावरण प्रेमींना लागून राहिली.  डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी या गंभीर घटनेची महापलिकेकडे तक्रार

केली.

 

या संपूर्ण प्रकरणाची त्वरित चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल महापालिकेने घेतली आहे.

 

केडीएमसीचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी त्या झाडांची पाहणी केली. हा सर्वच प्रकार अत्यंत धक्कादायक असून उद्यान विभागाला त्वरित चौकशीचे आदेश देण्यात

आले आहेत.  

 

जर, कोणी यात दोषी आढळले तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मोरे यांनी दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number