जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
डोंबिवलीत चोरट्यांनी चक्क डोळे तपासणीची मशिनच लंपास केल्याची घटना घडलीय. तब्बल 3 लाखांची ही मशिन असल्याचं समजतयं. नेत्रम ऑप्टिक्स दुकानात 30 मार्चला 3.30 च्या सुमारास चोरी झाली. मशीनसोबत दुकानातील इतर साहित्यसुद्धा दोन चोरट्यांनी लंपास केलंय. चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.
पोलीस चौकीच्या समोरच हा सर्व प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडालीय. याप्रकरणी आता विष्णूनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. डोळे तपासण्याची मशिन चोरट्यांनी लंपास केल्यानं सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जातंय.