जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली
डोंबिवलीमध्ये महिला होमगार्डला एका रिक्षा चालकानं दमदाटी करत त्या महिलेच्या अंगावर धावून गेल्याची घटना घडली.
याप्रकरणी महिला होमगार्ड सुनीता नंदमेहेर यांनी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
नामदेव खाडे या रिक्षाचालकाविरोधात त्यांनी तक्रार केली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
महिला होमगार्ड यांनी नामदेव यांना रिक्षा रांगेत उभे करण्यास सांगितलं होते. या गोष्टीचा राग मनात धरत खाडे यांनी होमगार्डशी वाद घालण्यास सुरूवात केली. त्यांना
दमदाटी करत त्यांच्या अंगावर धावून गेला.
विशेष म्हणजे जास्त भाडे आकारणे, प्रवाशांसोबत हुज्जत घालणे,जवळचे भाडे घेण्यास नकार देणे असे अनेक प्रकार काही मुजोर रिक्षा चालकांकडून सर्रास घडत
आहेत. त्यामुळे या मुजोर रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी होत आहे.