…जर तुम्ही घरात कुत्रे आणि मांजरी पाळत असाल तर सावधान! नाही तर तुमची जेलमध्ये रवानगी होईल

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   तुम्ही घरात कोणता प्राणी पाळलाय आणि त्याची निगा नीट राखत नसाल, तर सावध व्हा. पुण्यातील 2 महिलांना त्याचा फटका बसला आहे.   मांजरांची निगा न राखल्याने 2 महिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. कोंढव्यातील दीपिका कपूर आणि संगीता कपूर अशी यांच्या घरात तब्बल 29 मांजरी होत्या.   मात्र, या मांजरींची निगा […]

…जर तुम्ही घरात कुत्रे आणि मांजरी पाळत असाल तर सावधान! नाही तर तुमची जेलमध्ये रवानगी होईल

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

तुम्ही घरात कोणता प्राणी पाळलाय आणि त्याची निगा नीट राखत नसाल, तर सावध व्हा. पुण्यातील 2 महिलांना त्याचा फटका बसला आहे.

 

मांजरांची निगा न राखल्याने 2 महिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. कोंढव्यातील दीपिका कपूर आणि संगीता कपूर अशी यांच्या घरात तब्बल 29 मांजरी होत्या.

 

मात्र, या मांजरींची निगा राखली जात नाहीत, अत्यंत घाणेरड्या वातावरणात मांजरींना जगावं लागतं, अशी तक्रार शेजाऱ्यांनी केली होती. राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनीही मांजरांच्या मालकांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता.

 

दरम्यान या दोन्ही मालकांवर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडील मांजरीही ताब्यात घेतल्यात. त्यामुळे तुमच्या प्राण्यांचीही नीट निगा राखा, नाहीतर तुमच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number