जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी
मांजर आणि कुत्र्याचं वैर हे तर जग जाहीर आहे. मात्र, वैर विसरून आईच्या मायेची उब देणारं हे प्रेम पाहून डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत.
रत्नागिरीतील गुहागर तालुक्यात डावलवाडी परिसरात चंपी नावाच्या कुत्रीनं आपल्या पिल्लांप्रमाणे मांजरीच्या पिल्लाला दूध पाजत आहे. चंपी आपल्या कुशीत या मांजरीला मायेची उब देताना पाहायला मिळालंय.
इतरवेळी मांजर आणि कुत्रा समोर आले तरी एकमेकांच्या अंगावर धावून जातात. मात्र, इथे तर चंपी चक्क त्या मांजरीची आईचं झाल्याचं पाहायला मिळालंय. हे आईचं प्रेम पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केलीय.