औरंगाबादमध्ये 18 विद्यार्थ्यांना कुत्र्याचा चावा

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद औरंगाबादमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांवर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडलीय. पिसाळलेल्या कुत्र्याने एक दोन नव्हे तर, तब्बल 18 विद्यार्थ्यांचा चावा घेतला आहे. कुत्र्याच्या या हल्ल्यात विद्यार्थ्यी गंभीर जखमी झाले आहेत. औरंगाबाद शहरातील रहेमानिया कॉलनीत ही घटना घडली आहे. महापालिका शाळेतील  विद्यार्थी घरी परतताना कुत्र्यानं चावा घेतला. कुत्रा प्रचंड पिसाळलेला होता. प्रथम त्याने सय्यद ऐहतीशाम सय्यद […]

औरंगाबादमध्ये 18 विद्यार्थ्यांना कुत्र्याचा चावा

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

औरंगाबादमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांवर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडलीय. पिसाळलेल्या कुत्र्याने एक दोन नव्हे तर, तब्बल 18 विद्यार्थ्यांचा चावा घेतला आहे. कुत्र्याच्या या हल्ल्यात विद्यार्थ्यी गंभीर जखमी झाले आहेत. औरंगाबाद शहरातील रहेमानिया कॉलनीत ही घटना घडली आहे. महापालिका शाळेतील  विद्यार्थी घरी परतताना कुत्र्यानं चावा घेतला.

कुत्रा प्रचंड पिसाळलेला होता. प्रथम त्याने सय्यद ऐहतीशाम सय्यद हाशम या विद्यार्थ्यावर हल्ला करत त्याच्या गळ्याला आणि तोंडाला कडकडून चावा घेतला. त्यानंतर शाळेतून सुटणाऱ्या प्रत्येकावर तो हल्ला करत होता. एक एक करुन त्याने 18 विद्यार्थ्यांचा चावा घेतला. त्यानंर जखमी मुलांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, घाटी रुग्णालयात कुत्रा चावल्यानंतर द्यावयाचे प्रतिबंधात्मक इंजेक्शन उपलब्ध नसल्याने  पालकांची धावपळ उडाली.   

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number