‘अग्रलेखाला महत्त्व देत नाही’

शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले, असा थेट आरोप ठाकरे गटाच्या सामना या मुखपत्रातील अग्रलेखातून सोमवारी करण्यात आला होता. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला. आता या विषयावर खुद्द राष्ट्रवादीचे […]

‘अग्रलेखाला महत्त्व देत नाही’

शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले, असा थेट आरोप ठाकरे गटाच्या सामना या मुखपत्रातील अग्रलेखातून सोमवारी करण्यात आला होता. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला. आता या विषयावर खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार बोलले आहेत. हा आमच्या घरातला प्रश्न आहे. सामना अग्रलेखला महत्त्व देत नाही, असे सडेतोड उत्तर शरद पवारांनी दिले आहे.

शरद पवार कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६४ वी पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात आले. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. शरद पवार म्हणाले की, ‘आम्ही पक्षात काय करतो, हे राऊतांना माहित नाही. आम्ही काय केलं ते त्यांना माहित नाही. पक्षातील अनेक नेत्यांना कॅबिनेट मंत्री करून संधी दिली आहे. पण आम्ही कोणाला संधी दिली आणि काय केले हे जाहीर करत नाही. त्यामुळे कुणी आमच्यावर टीका केली तर दुर्लक्ष करतो. आम्ही कधी प्रसिद्धी नाही करत. सामना अग्रलेखला महत्त्व देत नाही. आम्ही काय करतो हे आम्हाला ठाऊक आहे. पक्षात काय होत तो आमच्या घरातला प्रश्न आहे. आम्ही आमचे काम करतो त्यांनी काहीही लिहू दे.’असे उत्तर शरद पवारांनी दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा शरद पवार यांनी करताच खळबळ माजणे साहजिकच होते. ही खळबळ देशाच्या राजकारणात माजली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या पक्षात माजली. कारण शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले व त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number