Doctors Strike : महाराष्ट्रात लाखो डॉक्टरांचा एल्गार! मुंबईतील KEM, सायन, नायर रुग्णालयांमध्ये OPD बंद; आरोग्यसेवा विस्कळीत

महाराष्ट्रातील रुग्णालयांमधील डॉक्टरांनी आजपासून संपाची हाक दिली. या आंदोलनाचे मुख्य कारण महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) 30 जून रोजी जारी केलेली एक अधिसूचना आहे.  

Doctors Strike : महाराष्ट्रात लाखो डॉक्टरांचा एल्गार! मुंबईतील KEM, सायन, नायर रुग्णालयांमध्ये OPD बंद;  आरोग्यसेवा विस्कळीत

महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांनी बुधवारपासून राज्यव्यापी अनिश्चित काळासाठी संपाची हाक दिली. डॉक्टरांनी अचानक काम थांबवल्यामुळे मुंबईतील केईएम, सायन, नायर आणि जेजे रुग्णालयांसह राज्यभरातील रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. ज्यामुळे रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सेंट्रल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD) आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) यांच्या आवाहनावरून सुरू झालेल्या या संपात राज्यभरातील 2 लाखांहून अधिक ॲलोपॅथिक डॉक्टर सहभागी झाले आहेत. या आंदोलनाचे मुख्य कारण महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) 30 जून रोजी जारी केलेली एक अधिसूचना आहे.  

मालेगावात मिक्सोपॅथीच्या निर्णयाविरोधात संतापाची लाट आहे. होमिओपॅथी, आयुर्वेद डॉक्टरांना एलोपॅथी प्रॅक्टिसची मुभा दिल्याने आरोग्य क्षेत्रात संभ्रम निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे रुग्णांच्या सुरक्षेला धोका असल्याचे सांगत डॉक्टर संघटनांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. अँटिबायोटिक्सचा बेजबाबदार वापर टाळावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

हेही वाचा- Mark Zuckerberg Apology : मार्क झुकरबर्ग अखेर झुकले! पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ हटवल्याप्रकरणी मागितली माफी
 

गोंदिया आज डॉक्टरांच्या संप
महाराष्ट्र सरकार द्वारा होमिओपॅथिक डॉक्टरांना सीसीएमपी सर्टिफिकेट वाटण्याच्या कारणावरून महाराष्ट्रातील सर्व ऍलोपॅथिक डॉक्टरांनी आंदोलन पुकारला असून आज त्याचे पडसाद गोंदिया जिल्ह्यात सुद्धा पाहायला मिळून आले. गोंदिया जिल्ह्यातील डॉक्टरांनी संप पुकारला असून जिल्हा रुग्णालयातील ओपीडी आज बंद ठेवण्यात आली आहे. मात्र जर सरकारने यावर निर्णय घेतला नाही तर रात्रीपासून अत्यावश्यक सेवा बंद करून देण्याच्या इशारा MARD या डॉक्टर संघटनेने दिला आहे. सहा वर्षाचा कोर्स हा सहा  महिन्यातच कोणी पूर्ण करून दुसऱ्यांच्या पेथी मध्ये कसा घुसखोरी करू शकतो असा प्रश्न यावेळी डॉक्टरांनी उपस्थित केला. मात्र जर सरकारने याची योग्य दखल घेतली नाही तर रात्रीपासून अत्यावश्यक सेवा बंद होणार असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील रुग्णांना मोठा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागपुरात 700 निवासी डॉक्टर संपावर
नागपुरातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय जी एम सी मध्ये 900 पैकी सुमारे 700 निवासी डॉक्टर संपावर गेले आहे. तर उर्वरित 200 निवासी डॉक्टर वरिष्ठ डॉक्टरांना आपातकालीन सेवा आणि काही प्रमाणात ओपीडी सेवा चालवण्यामध्ये मदत करत आहे. जर आज रात्रीपर्यंत शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांना एक वर्षाचा सीसीएमपी कोर्स करून ऍलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्याचा निर्णय मागे घेतला नाही, तर येणाऱ्या दिवसात निवासी डॉक्टरांचा संप आणखी तीव्र होईल आणि आपातकालीन रुग्ण सेवा ही बंद केली जाईल? असा इशारा संपावर गेलेल्या निवासी डॉक्टरांनी दिला आहे. आमचा आंदोलन आमच्यासाठी नाही तर रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आहे. साडेपाच वर्ष एमबीबीएस चे शिक्षण घेतल्यानंतर आम्ही औषध आणि रुग्णांच्या उपचाराबद्दल जो शिक्षण घेतो, तो होमिओपॅथीचा डॉक्टर अवघ्या एका वर्षाच्या सीसीएमपी कोर्स द्वारे शिकू शकत नाही. अवघ्या एका वर्षाच्या प्रशिक्षणाद्वारे ऍलोपॅथी औषधोपचाराची परवानगी दिल्याने भविष्यात रुग्णांच्या जीविताशी खेळ होईल असंही संप करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number