डॉक्टरांचा देशव्यापी संप;रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाविरोधात देशातील डॉक्टर आज संपावर जाणार आहेत. मात्र, रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत. नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ जानेवारीला डॉक्टरांची संघटना इंडियन मेडिकल असोसिएशन 12 तास संपावर जाणार आहे. अचानक लाखो डॉक्टर संपावर गेल्याने रूग्णांना याचा खूप मोठा फटका बसण्याची […]

डॉक्टरांचा देशव्यापी संप;रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाविरोधात देशातील डॉक्टर आज संपावर जाणार आहेत. मात्र, रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत. नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ जानेवारीला डॉक्टरांची संघटना इंडियन मेडिकल असोसिएशन 12 तास संपावर जाणार आहे.

अचानक लाखो डॉक्टर संपावर गेल्याने रूग्णांना याचा खूप मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र, डॉक्टरांच्या संपाचा फटका रूग्णांना बसू नये यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पाऊले उचलली आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून दिल्लीतील काही रूग्णालयांना पत्र लिहिण्यात आले हे. या पत्राद्वारे मंत्रालयाकडून रूग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number