डॉकयार्ड परिसरात गोदामाला आग; आगीत 5 दुकानं जळून खाक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई डॉकयार्ड रोड येथील जमेरिया बिल्डिंगमधील एका गोदामाला आग लागली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, जमेरिया बिल्डिंगमधील गोदामाला सोमवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास आग लागली. आगीची घटना समजताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवून […]

डॉकयार्ड परिसरात  गोदामाला आग; आगीत 5 दुकानं जळून खाक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

डॉकयार्ड रोड येथील जमेरिया बिल्डिंगमधील एका गोदामाला आग लागली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, जमेरिया बिल्डिंगमधील गोदामाला सोमवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास आग लागली.

आगीची घटना समजताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवून आग विझवली. ही आग कशामुळे लागली याबाबत अद्याप काही समजू शकले नाही.

तसेच, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. मात्र, आगीमुळे बिल्डिंगमधील सात दुकानं जळून खाक झाली आहेत.

  नववर्षाच्या पूर्वसंध्येला सुरू झालेले आगीचे सत्र मुंबईत सुरूच असून, नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात 7 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. यापैकी काही आगींमध्ये केवळ वित्तहानीवर निभवले, तर 2 आगींमध्ये 5 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे मुंबईतील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number