वृत्तसंस्था, नवी दिल्ली
आजकाल स्थानिक स्तरावर काम करणा-या लोकप्रतिनिधींकडील संपत्तीही सहज कोट्यवधी रुपयांच्या घरात जाते. अशा काळात माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडील संपत्तीचा आकडा मात्र 60 लाख रुपयांच्याही आत आहे.
भारतीय राजकारणात पन्नास वर्षांहूनही अधिका काळ घालवून आणि पंतप्रधापदासारखे पद भूषवूनही वाजपेयी यांनी आपल्या मागे जेमतेम 58 लाख 99 हजार 232 रुपयांची संपत्ती ठेवली आहे.
वाजपेयी यांच्याकडील स्थावर मालमत्ता म्हणजेच घर, जमीन अशा स्वरूपातील संपत्ती जेमतेम 28 लाख रुपये इतकी आहे.
दिल्लीच्या ईस्ट ऑफ कैलाशमध्ये फ्लॅट- रु. 22 लाख रुपये
ग्वाल्हेर येथील घराची किंमत- रु. 6 लाख
वाजपेयी यांच्याकडील जंगम मालमत्ताही 30,99,232 रुपये इतकी आहे.
स्टेट बँकेतील एका खात्यात रु. 20,000
दुस-यामध्ये रु. 3,82,886
तिस-यामध्ये रु. 25,75,562
इतकी शिल्लक जमा आहे.
2004 साली वाजपेयींनी लखनऊमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामुसार त्यांच्याकडील संपत्ती 58 लाख रुपयांची होती.
1987 साली वाजपेयी किडनीच्या आजाराशी झुंज देत होते. उपचारांसाठी अमेरिकेत जाण्याइतकेही पैसे तेव्हा वाजपेयी यांच्याकडे नव्हते. अशावेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी वाजपेयींना मदत केली होती. एका मुलाखतीदरम्यान ही आठवण सांगत वाजपेयी यांनी राजीव गांधी यांचे आभार मानले होते.
यावरून वाजपेयी यांच्या निरीच्छ व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते. अर्थात वाजपेयी यांचे प्रेरणादायी विचार, साहित्य आणि त्यांचे कर्तृत्व ही त्यांनी मागे ठेवलेली खरी संपत्ती आहे.
वाजपेयींना अखेरचा निरोप – Pics
वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण…
वाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी
वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण
राज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली…
जाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल…
वाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित…
वाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल…
अशुभ ’13’ अंकाशी वाजपेयींचं खास नातं
वाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार…
वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना!
भारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर…
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द…
अटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल…