जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्य परिवहन मंडळाच्या प्रत्येक बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेल्या पाट्या लवकरच झळकलेल्या पाहायला मिळणार आहेत. बेळगावमध्ये जय महाराष्ट्र घोषणेवरुन झालेल्या वादानंतर राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी याबाबत घोषणा केली आहे.
काही दिवसांपूर्वी कर्नाटक नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी कर्नाटकच्या लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्र म्हणल्यास कारवाईचा इशारा दिला होता. बेग यांच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात वाद निर्माण झाला होता.
विशेष म्हणजे, यानंतर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना कर्नाटक बंदीचा फतवा बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्याने, यावरुन राजकारण चांगलंच तापलं होतं. यावरुन आता रावतेंनी राज्य परिवहन मंडळाच्या प्रत्येक बसवर ‘जय महाराष्ट्र’ची पाटी लावण्याची घोषणा केली आहे.