सातारा : साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदल झाली आहे. साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची पुण्यात बदली झाली आहे. तर सातारकरांना नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत.
राज्य सरकारने राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरू ठेवले असून जितेंद्र डुडी यांची बदली केले आहे. डुडी यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून बदली केली आहे. जितेंद्र डुडी यांनी सातारचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तर साताऱ्याला नवीन जिल्हाधिकारी मिळाले आहेत. संतोष पाटील यांच्याकडे साताऱ्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
संतोष पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील उंडेगाव, ता. बार्शी येथील रहिवाशी आहेत. 1996 मध्ये ते राज्य प्रशासकीय सेवेत रूजू झाले. आतापर्यंत त्यांनी विविध ठिकाणी काम केले आहे.
हेही वाचा : नवीन वर्षातील पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
दरम्यान जितेंद्र डुडी यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांनी आधी सातारचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. जितेंद्र यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीचे काम पाहिले आहे. त्यांच्या काळात शांततेत निवडणूका पार पडल्या. सुमारे दीड वर्ष त्यांनी सातारचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले. त्यांच्या काळाच अनेक उल्लेखनीय काम करण्यात आली.