‘जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांना अपात्र करा’

मुंबई, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर आता शरद पवारआणि अजित पवार गटाकडून एकमेकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पदमुक्त करत आहोत. तसेच प्रदेशाध्यक्षपदी सुनिल तटकरे यांची नियुक्ती केल्याची घोषणा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी काही वेळेपूर्वीच केली. दरम्यान, शरद पवार यांनी प्रफुल पटेल यांचे निलंबन केल्याचे […]

‘जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांना अपात्र करा’

मुंबई, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर आता शरद पवारआणि अजित पवार गटाकडून एकमेकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पदमुक्त करत आहोत. तसेच प्रदेशाध्यक्षपदी सुनिल तटकरे यांची नियुक्ती केल्याची घोषणा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी काही वेळेपूर्वीच केली. दरम्यान, शरद पवार यांनी प्रफुल पटेल यांचे निलंबन केल्याचे ट्विटद्वारे जाहीर केले होते. पण आपण एक दिवस आधीच सुनिल तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे, असे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे अजित पवार यांनी थेट जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्यावरच कारवाईसाठी पाऊले उचलली आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांनी मला विधिमंडळ नेता म्हणून निवडले आहे, त्यामुळे मी जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांना अपात्र करण्याबाबत कालच विधानसभा अध्यक्षांना पत्र दिल्याचे अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंडाच्या दुसऱ्या दिवशी शरद पवार यांचा मूळ पक्ष आणि अजित पवार यांच्या फुटीर गटादरम्यान जोरदार कलगीतुरा रंगला आहे. या दोन्ही गटांने एकमेकांविरुद्ध कारवाया-प्रतिकारवायांची सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांनी बंडात सामील होत अजित पवार यांना साथ दिल्याचं कारण देत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी प्राथमिक सदस्यत्व रद्द केल्याचं जाहीर केलं. पवारांच्या या घोषणेनंतर अजित पवार यांच्या फुटीर गटाने लगेच पत्रकार परिषद घेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड हेच पक्षविरोधी कारवाया करत असल्याचा ठपका ठेवला आहे. या दोघांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचं सांगत त्यांना अपात्र करा असं पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांना लिहिलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते या नात्याने आपण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना यासंदर्भात पत्र लिहिलं असल्याची माहिती खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

एकाला विरोधी पक्षनेता आणि प्रतोद म्हणून नियुक्त केले गेले आहे अशी बातमी मी वाचली. विधिमंडळामध्ये मी बरीच वर्ष काम केलेले आहे. विरोधी पक्षनेते नियुक्तीचे अधिकार हे विधानसभा अध्यक्षांकडे असते. अधिवेशन सुरू असताना विधानसभा अध्यक्ष सत्तेत नसलेल्या पक्षामध्ये ज्याची संख्या जास्त असते त्या पक्षाच्या नेत्याची विरोधी पक्षनेता म्हणून नेमणूक करतात. राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण व्हावी, यासाठी काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, याला काही अर्थ नाही, असे म्हणत अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांनाही टोला लगावला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number