बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लांबणीवर

एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपत्रातेबाबतचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी ठेवली आहे. आजच्या सुनावणीदरम्यान शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला होता. शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी या प्रकरणाची सुनावणी तातडीने होण्याचा आग्रह धरला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांचे वकील हरिश साळवे […]

बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लांबणीवर

एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपत्रातेबाबतचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी ठेवली आहे. आजच्या सुनावणीदरम्यान शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला होता. शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी या प्रकरणाची सुनावणी तातडीने होण्याचा आग्रह धरला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांचे वकील हरिश साळवे यांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत हवी असल्याचे सांगितले आहे. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही या प्रकरणाला घटनेतील अनेक कायद्यांचे कंगोरे असल्याचे म्हटले. त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी होणार आहे.

मात्र, २७ जुलैपर्यंत दोन्ही बाजूंना प्रतिज्ञापत्रद्वारे आपली भूमिका मांडावी लागणार आहे. आता या ११ दिवसांच्या काळात शिवसेना पक्षातील आणखी काही लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी फुटून वेगळीच परिस्थिती निर्माण होते का, हे पाहावे लागेल. सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांनी सुनावणीदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण टिप्पण्या केल्या. काही मुद्दे अतिशय घटनात्मक असल्याने तातडीने सुनावणी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. सरन्यायाधीशांनी दोन्ही बाजूंना मंगळवारपर्यंत शपथपत्र दाखल करण्यास सांगितले आहे. या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी हे प्रकरण मोठ्या खंडपीठासमोर नेणे गरजेचे असल्याची टिप्पणी केली होती. मात्र, त्याबाबत त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. तसेच गटनेता बदलणे हा पक्षाचा अधिकार आहे. त्याशिवाय, बहुमताने सदस्य निवडू शकतात. एखादा वाद उद्भवल्यास विधानसभा अध्यक्ष हस्तक्षेप करू शकतात, असे सरन्यायाधीशांनी म्हटले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number