आयोध्या, ज्ञानवापी आणि काशीनंतर आता हनुमान जन्मभूमी वाद सुरू झाला आहे. त्यातच आता हनुमानाची जन्मभूमी ही किष्किंधा असल्याचा दावा गोविंदानंद सरस्वती महाराजांनी केला आहे. तर, त्र्यंबकेश्वरमधील अंजनेरी ही तपोभूमी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हनुमानाचे जन्मस्थान किष्किंदा आहे की अंजनेरी यासंदर्भात विद्वानांनी लेखी पुरावे मांडावे असं त्रंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी आवाहन केल्याचं पाहायला मिळतं. गोविंदानंद यांचं नाशिकच्या संत महंतांना अंजनेरी हनुमान जन्मभूमी असल्याचं सिद्ध करण्याचं आव्हान करण्यात आलं आहे.
नाशिकमधील महंतांची हनुमान जन्मस्थळावरून मतात फरक असल्याने नवीन वादाला सुरूवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. हनुमानाचं जन्मस्थान देशात कुठे आहे, यावरून देशाच्या उत्तरेकडे सध्या मोठा वाद सुरू आहे. देशातून तब्बल ९ ठिकाणी हनुमानाच्या जन्मस्थानाचा दावा केला जातो. त्याचेच पडसाद नाशिकमध्ये उमटत आहेत. जिथं एका चर्चेचं आयोजन त्र्यंबकेश्वरमध्ये करण्यात आलं होतं. जिथं किष्किंधाचे गोविंदाचार्यही इथं आले होते. शिवाय काही अभ्यासकांनीही इथं हजेरी लावली.
तिथेच काही जुने संदर्भही दाखवण्यात आले आहे. वाल्मिकी रामायणाचेही संदर्भ इथं देण्यात आले आणि अंजनेरी येथे हनुमानाची जन्मभूमी असल्याचं यातून स्पष्ट झालं आहे. तर, किष्किंधा हीच हनुमानाची जन्मभूमी असल्याचं समोर आलं आहे. अंजनेरी नगरी इथं केवळ तपोभूमी असून हनुमान तिथे लहानपणी खेळल्याचे संदर्भ मिळाले आहेत, याच चर्चेमुळे नव्या वादाला तोंड फुटत आहे.