भारतीय लष्कराकडून शस्त्रांचं प्रदर्शन

नाशिक मध्ये आज know your army या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.. या कार्यक्रमात भारतीय लष्कराकडून वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांच प्रदर्शन भरवण्यात आले होते..यात तोफासह इतर युद्धामध्ये आजवर वापरले गेलेले आणि शस्त्र नागरिकांना प्रथमच पाहायला मिळणार आहे.. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. पहिल्यांदाच भारतीय लष्करांकडून वापरले जाणाऱ्या शस्त्रांच प्रदर्शन भरवण्यात […]

भारतीय लष्कराकडून शस्त्रांचं प्रदर्शन

नाशिक मध्ये आज know your army या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.. या कार्यक्रमात भारतीय लष्कराकडून वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांच प्रदर्शन भरवण्यात आले होते..यात तोफासह इतर युद्धामध्ये आजवर वापरले गेलेले आणि शस्त्र नागरिकांना प्रथमच पाहायला मिळणार आहे.. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. पहिल्यांदाच भारतीय लष्करांकडून वापरले जाणाऱ्या शस्त्रांच प्रदर्शन भरवण्यात आल्याने हे शस्त्र पाहण्यासाठी नाशिककरांनी देखील मोठी गर्दी केली होती.

प्रदर्शनात लष्कराच्या सदर्न कमांड अंतर्गत विविध सात राज्यातील लष्करी विभागांचे केवळ आर्टिलरीच नव्हे तर इतर शस्त्रास्त्रे प्रदर्शित केली आहे. तोफखाना (विविध तोफा), शस्त्रागार, अभियंता उपकरणे, हवाई दल, आर्मी एव्हिएशन, वैद्यकीय उपकरणे प्रदर्शन, पायदळ, निवृत्त सैनिकांच्या सेवेसाठी आर्मी रेकॉर्ड स्टॉल, प्रादेशिक सैन्य शस्त्रे, सिम्फनी बँड, आर्मी बँड, घोडदौड, टेन्ट पॅकिंग, डेअर डेव्हिल्स, जिम्नॅस्टिक लाइव्ह शो हे प्रदर्शनाचे आकर्षण आहे. संरक्षण दल वापरत असलेल्या आधुनिक शस्त्रास्त्रांचे हे प्रदर्शन आहे. यात तरुणांना सैनिकांशी संवाद साधण्यासाठी तसेच अग्नीवीर भरती संदर्भात देखील इथे मार्गदर्शन केले गेले. प्रथमच एवढं भव्य व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. खासदार हेमंत गोडसे आणि संरक्षण दलाच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित झाला आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले कि एक काळ असा होता की, आपण शस्त्र आयात करायचो.पण, मोदीजींच्या नेतृत्वात मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया उपक्रम सुरू झाले आहे. एक काळ असा होता की, आपण सगळं काही आयात करत होतो. आता आपण संरक्षण साहित्य निर्यात करतो.आपले शुर सैनिक जे कार्य करतात, ते जे सामग्री वापरतात, याची माहिती जनतेला व्हावी, म्हणून याचे आयोजन झाले आहे.अतिशय हुशार विद्यार्थी सैन्य दलाकडे वळत आहे. आज संरक्षणामध्ये जे संशोधन सुरू आहे, त्यामुळे नवीन रोजगार निर्मिती होईल. नागपूरला जे राफेल एयरक्राफ्ट आहे, तिथे मुलांना रोजगार मिळत आहे. नागपूरला फाल्कन जेट देखील तयार होणार आहे. नाशिकमध्ये देखील संरक्षणबाबत उत्पादनसाठी वाव आहे. येणाऱ्या काळात आपण आपल्या सीमांचे रक्षण तर करूच, पण सामर्थ्य झाल्याने कुठलेही राष्ट्र वाकडी नजर ठेऊन आपल्याकडे बघू शकणार नाही. यात तिन्ही सेनांचे योगदान आहे.या विद्यार्थ्यांना सैन्य दलाविषयी माहिती मिळणार आहे.

प्रदर्शनात आयुध साहित्य

प्रदर्शनात तोफा, रणगाडे, रायफल्स, रॉकेट लाऊंचर्स, इंडियन फील्ड गन, आर्मी अभियंता साहित्य, बोफोर्स, धनुष्य, १०५ आयएफजी, एलएमजी गन, आदी आयुध साहित्य प्रदर्शित केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number