Disha Patani House Firing Case : दिशा पटानीच्या बहिणीच्या ‘त्या’ पोस्टमुळे घरावर हल्ला झाल्याचा संशय, सीसीटीव्ही फुटेजही समोर

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली. यानंतर आता दिशाच्या घरावर गोळीबार करणाऱ्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

Disha Patani House Firing Case : दिशा पटानीच्या बहिणीच्या ‘त्या’ पोस्टमुळे घरावर हल्ला झाल्याचा संशय, सीसीटीव्ही फुटेजही समोर

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली. यानंतर आता दिशाच्या घरावर गोळीबार करणाऱ्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. इतकंच नाही तर हा हल्ला का झाला आणि कोणी केला याचीही माहिती समोर आली आहे. 

दिशाच्या बरेली येथील घरावर 12 सप्टेंबर रोजी पहाटे 4.30 वाजता गोळीबार झाला. यावेळी घरात तिचे आई- वडील आणि मोठी बहीण खुशबू पटानी होती. घराबाबेर बाहेर दोन राउंड गोळीबार झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

सीसीटीव्ही फुटेज समोर 
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दरोडेखोर दुचाकीवरुन आले आणि त्यांनी गोळीबार केला. हल्लेखोर दिल्ली-लखनऊ महामार्गावरून आले होते आणि गोळीबार करुन सात ते आठ मिनिटात शहर सोडून गेले. पोलीस सध्या अभिनेत्रीच्या घरापासून महामार्गापर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.

हेही वाचा: 'स्वतःसाठी कोणताही आर्थिक लाभ…', करिश्मा कपूरच्या वकिलाचा न्यायालयात खुलासा, खटला करण्याचं सांगितलं कारण

पोलिसांनी केलेल्या तपासात गोळीबार करण्यापूर्वी हल्लेखोरांनी दिशा पटानीच्या घराची रेकी केली होती असे समोर आले आहे. या घटनेत 2/3 गोळ्या झाडल्या गेल्या असून पोलिसांनी सात राउंड गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. 

बरेली पोलीस ठाण्यातील एसपी अनुराग आर्य यांनी या घटनेवर निवेदन दिले आहे. आर्य यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर करत घटना गंभीर असल्याचे म्हटले आहे. 

खुशबू पटानीची वादग्रस्त पोस्ट
दिशाची बहिण खुशबू पटानीने जुलै महिन्यात इंस्टाग्राम स्टोरीवरून कथावाचक अनिरुद्धाचार्य यांच्याबद्दल काही वादग्रस्त विधान केले होते. सुरुवातीला तिची विधाने प्रेमानंद जी महाराजांशी जोडली गेली आणि मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर खुशबूने व्हिडिओ जारी करून स्पष्टीकरण दिले की तिचा उद्देश अनिरुद्धाचार्यांविषयी होता. 

या वादानंतर खुशबू पटानीला लक्ष्य केले गेले. तिच्या पोस्टनंतर काही दिवसांनी वीरेंद्र चरण आणि महेंद्र सरन या गुंडांनी सोशल मीडियावर धमकीचे निवेदन जारी केले. यानंतरच बरेलीतील दिशा पटानीच्या घरी गोळीबार झाला असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. अशीही माहिती समोर आली आहे की, यूएसएमध्ये असलेला कुख्यात गुंड रोहित गोदारा गोल्डी ब्रार गँगने स्वत: वॉइस मेसेज करत दिशा पटानीच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number