वृत्तसंस्था, नवी दिल्ली
दिशा पाटनी लवकरच आगामी सिनेमा ‘बागी-2’ मधून झळकणार आहे. या चित्रपटात बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसोबत झळकणार आहे. नुकताच दिशाचा शाळेच्या दिवसातील एक फोटो समोर आला आहे. हा फोटो दिशाचा सातवी वर्गात असतानाचा आहे ज्यामध्ये ती तिच्या क्लासमेट्ससोबत दिसत आहे. फोटोवरुन एका न्यूज पोर्टलवर दिशा भडकली आहे.
दिशाच्या शाळेच्या दिवसातील या फोटोबद्दल न्यूज पोर्टलने लिहीले की कधीकाळी इतकी कुरुप दिसायची दिशा पाटनी. दिशाने या बातमीवरुन लिहीले की, हो बरोबर आहे, मी एक सुंदर गाऊन घालायला हवा होता आणि मेकअप आणि छान हेअरस्टाईल करुन सातवीत असताना शाळेत जायला पाहिजे होते तेव्हा तुम्हाला एखादी छान हेडलाईन मिळाली असती. त्यानंतर तिने टोमणा मारत याच्याहून चांगली बातमी तुम्हाला मिळाली नाही का असेही लिहीले.