बॉलीवूड बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पटानी ही वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत असते. बऱ्याचदा तिच्या ड्रेसिंग सेन्सवरून तिला ट्रोल केले जाते. दरम्यान पुन्हा एकदा ती ट्रोल झाली आहे. यावेळी सोशल मीडियावर तिच्या या वागण्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. अभिनेत्री दिशा पटानी नुकतंच वाराणसी येथे गंगा आरतीत सामिल झाली होती.या दरम्यान दिशाने घातलेल्या ड्रेसकडे नेटकऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.
अभिनेत्री दिशा पटानी गंगा आरतीत सहभागी झाली होती त्यासोबतच तिने तिथल्या आजुबाजूच्या धार्मिक वातावरणाचा आणि निसर्गाचा देखील आनंदही घेतला. पण गंगा आरती करताना दिशानं ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप घातला होता आणि ब्लॅक टाईट जीन्स परिधान केली होती. त्यावर तिने एक शाल लपेटली होती. पण तिला या अवतारात पाहून तिचे चाहते मात्र नाराज झाले आहेत. काहींनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
दिशाचा या अवतारातील फोटो आणि विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत ती मॉडर्न कपड्यांमध्ये दिसत आहे. तसेच दिशानं केसांचा बन बांधलेला आहे आणि तिच्या कपाळावर देवाचा टिळा देखील दिसत आहे. ती जरी फॅशन सेन्स साठी ओळखली जात असली तरीही धार्मिक ठिकाणी असे कपडे घातल्याने नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरले आहे.