नाशकात भोंग्यांसाठी परवानगी आवश्यक

नाशिकमध्ये सर्व धार्मिक स्थळांना भोंगे लावण्यासाठी आता परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी न घेतल्या गेलेल्या अनधिकृत भोंग्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे आदेश नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत. ३ मेपर्यंत सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. भोंग्यावर हनुमान चालिसा लावायची असो किंवा अजान, पोलिसांची परवानगी आवश्यक असल्याचं नाशिक पोलीस आयुक्त दीपक […]

नाशकात भोंग्यांसाठी परवानगी आवश्यक

नाशिकमध्ये सर्व धार्मिक स्थळांना भोंगे लावण्यासाठी आता परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी न घेतल्या गेलेल्या अनधिकृत भोंग्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे आदेश नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत. ३ मेपर्यंत सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे.

भोंग्यावर हनुमान चालिसा लावायची असो किंवा अजान, पोलिसांची परवानगी आवश्यक असल्याचं नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले आहे. ३ मेपर्यंत या परवानग्या आवश्यक असून ३ मे नंतर थेट पोलीस कारवाई होऊन भोंगे उतरवण्यात येतील असा इशाराही पांडे यांनी दिला आहे. ‘मुस्लिम धर्मियांना भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार’, ‘भोंग्यावर हनुमान चालीसा लावायचे असेल तरी परवानगी आवश्यक असल्याचे दीपक पांडे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, या प्रकरणी परवानगी न घेतल्या गेलेल्या अनधिकृत भोंग्यांवर कारवाई केली जाणार आहे. तर, मशिदीच्या १०० मीटर परिसरात हनुमान चालीसा म्हणण्यास पोलिस आयुक्तांनी मनाई केली आहे.

काय आहे भोंगा प्रकरण ?

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादाची आक्रमक भूमिका घेतली होती. मशिदींवरील भोंगे बंद झाले नाही तर मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार असे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भोंगा प्रकरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे याप्रकरणी राजकीय वर्तुळात तसेच विविध सामाजिक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number