बॉईज टाऊन शाळेत दिंडीचे आयोजन

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. २६ जून) नाशिकच्या बॉईज टॉऊन स्कूलमध्ये भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दोन वर्षे कोरोनामुळे खंड पडलेल्या दिंडीला यावर्षी पुन्हा सुरुवात झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी शाळा परिसरात एकच आनंद उत्सव साजरा केला. यावेळी जवळजवळ ४०० विद्यार्थी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून दिंडीत सहभागी झाले. टाळ- मृदुंगाच्या तालावर नाचत, विठुरायाच्या नावाचे स्मरण […]

बॉईज टाऊन शाळेत दिंडीचे आयोजन

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. २६ जून) नाशिकच्या बॉईज टॉऊन स्कूलमध्ये भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दोन वर्षे कोरोनामुळे खंड पडलेल्या दिंडीला यावर्षी पुन्हा सुरुवात झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी शाळा परिसरात एकच आनंद उत्सव साजरा केला. यावेळी जवळजवळ ४०० विद्यार्थी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून दिंडीत सहभागी झाले. टाळ- मृदुंगाच्या तालावर नाचत, विठुरायाच्या नावाचे स्मरण करत आषाढी एकादशी साजरी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मणीची आणि वासुदेवाची वेशभूषा केली होती. या सुंदर अशा वातावरणात शिक्षकांनीदेखील फुगडी खेळून आपला सहभाग नोंदवला. यावेळी शाळा परिसरातील वातावरण भक्तीमय झाल्याचे दिसून आले. शाळा परिसरात पंढरपूर भेटीच स्वरूप प्राप्त झाले. त्याचबरोबर वारीचे मुख्य आकर्षण असलेले गोल रिंगणदेखील यावेळी पार पडले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number