ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचा 95 वा जन्मदिवस;ट्विटरवरुन दिला चाहत्यांना संदेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   ट्रेजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. बॉलिवूड अभिनेता दिलीप कुमार आज 95 वर्षांचे झाले आहेत. 11 डिसेंबर 1922 रोजी पाकिस्तानच्या पेशावरमध्ये जन्मलेले दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद यूसुफ खान असे आहे. बॉलिवूड सिनेतारकांमधील वरिष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे यावेळी […]

ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचा 95 वा जन्मदिवस;ट्विटरवरुन दिला चाहत्यांना संदेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ट्रेजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. बॉलिवूड अभिनेता दिलीप कुमार आज 95 वर्षांचे झाले आहेत. 11 डिसेंबर 1922 रोजी पाकिस्तानच्या पेशावरमध्ये जन्मलेले दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद यूसुफ खान असे आहे. बॉलिवूड सिनेतारकांमधील वरिष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे यावेळी त्यांचा जन्मदिवस साजरा करता येणार नसल्याचे त्यांची पत्नी सायरा बानोने सांगितले आहे.

तर दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांच्या चाहत्यांसाठी एक संदेश देण्यात आला आहे. आपण दिलीप कुमार यांचे आत्मचरित्र वाचले असेल, तर तुम्ही त्यांच्या भाषणाला नक्कीच परिचित असाल. अनोळखी व्यक्तींकडून मिळालेले प्रतिसाद हे त्यांच्यासाठी एखाद्या पुरस्कारापेक्षाही खूप मोठे आहे. देव तुम्हा सर्वांचे कल्याण करो. अशा प्रकारचा संदेश देण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number