पत्रकारांवर बोलताना दिलीप कांबळेंची जीभ घसरली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेंची जीभ पुन्हा एकदा घसरली. हिंगोली जिल्ह्यातल्या शिवार संवाद कार्यक्रमात कांबळे थेट पत्रकारांवरच घसरले. शिवार संवादासाठी आलेले दिलीप कांबळे हारतुऱ्यापुरतेच मर्यादीत असल्याची टीका प्रसारमाध्यमांनी केली होती. त्यावरच दिलीप कांबळेंचा तीळपापड झाला.   पत्रकारांच्या जीवावर राजकारण चालतं का? पाकिट मिळाल्यावर ते वाटेल तसं लिहीतात असं वादग्रस्त वक्तव्य […]

पत्रकारांवर बोलताना दिलीप कांबळेंची जीभ घसरली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेंची जीभ पुन्हा एकदा घसरली. हिंगोली जिल्ह्यातल्या शिवार संवाद कार्यक्रमात कांबळे थेट पत्रकारांवरच घसरले. शिवार संवादासाठी आलेले दिलीप कांबळे हारतुऱ्यापुरतेच मर्यादीत असल्याची टीका प्रसारमाध्यमांनी केली होती. त्यावरच दिलीप कांबळेंचा तीळपापड झाला.

 

पत्रकारांच्या जीवावर राजकारण चालतं का? पाकिट मिळाल्यावर ते वाटेल तसं लिहीतात असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. पण ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर थेट पत्रकारांना जोड्यानंच मारण्याची भाषा त्यांनी केली. पत्रकारांवर जीभ घसरल्यानंतर कांबळे काँग्रेस नेते दर्डांवरही घसरले. काँग्रेसवाल्यांचं लोकमत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर दर्डांनी खातं विकून खाल्याचं वादग्रस्त विधानही त्यांनी केलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number