Dhurandhar Box Office Colletion : रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ची छप्परफाड कमाई , अवघ्या दोन दिवसांत कमवाले…

आदित्य धर आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष असे जणू आता समीकरण झाले आहे. अशातच मल्टिस्टार्सची मांदियाळी असणारा अक्षणपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.  

Dhurandhar Box Office Colletion : रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ची छप्परफाड कमाई , अवघ्या दोन दिवसांत कमवाले…

गेल्या अनेक दिवसांपासून आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला 'धुरंधर' सिनेमा 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. आदित्य धर आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष असे जणू आता समीकरण झाले आहे. अशातच मल्टिस्टार्सची मांदियाळी असणारा अक्षणपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.  चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ अॅक्शन चित्रपट नाही तर हेरगिरी, थ्रिलर आणि धोकादायक मोहिमांची कहाणी आहे, ज्याचा प्रत्येक दृश्य थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेला आहे.या चित्रपटात रणवीर सिंगसोबत संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

भारतावर आजवर अनेक दहशतवादी हल्ले झाले.समोर आलेल्या माहितीनुसार हे सर्व हल्ले करण्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. या चित्रपटाची कथादेखील दहशतवादी हल्ल्यावरुन प्रेरित आहे. 1999 साली भारतीय विमान आयसी-814 चे अपहरण तसेच 2001 साली संसदेवर झालेला दहशतवादी हल्ला. त्यानंतर भारतात संरक्षण विभागाने कोणत्या योजना आखल्या. त्याबद्दल या चित्रपतात सांगण्यात आले आहे.चित्रपटाच्या सुरुवातीलाचं आर. माधवन दाखवला गेला आहे. त्याच्याकडून एक एक पात्र समोर येणास सुरुवात होते. 

रणवीर सिंग हमजाच्या भूमिकेत अगदी फिट बसतो. त्याचा लूक, बॉडी लँग्वेज आणि अॅक्शन एनर्जी संपूर्ण चित्रपटात प्रेक्षकांना खिळवून ठेवते. अनेक दृश्यांमध्ये त्याचा दमदार अभिनय चित्रपटाचे आकर्षण ठरतो. खलनायकाच्या भूमिकेत अक्षय खन्ना धमकीदायक आणि प्रभावी आहे, त्याच्या प्रत्येक संवादात आणि प्रवेशात तो भावनिक आणि भयभीत आहे.

संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि आर माधवन यांची उपस्थिती आणि अभिनय चित्रपटाची कथा विश्वासार्ह बनवतो. सारा अर्जुन, छोट्या पडद्यावर वेळ असूनही, तिच्या व्यक्तिरेखेत नैसर्गिकता आणि भावनिक आयाम जोडते, ज्यामुळे चित्रपटातील गंभीर भाग अधिक प्रभावी बनतात.

शुक्रवारी रणवीरच्या चित्रपटाने २८.६० कोटी  रुपये कमावले. या वर्षातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा ओपनिंग डे ठरला. रिलीजपूर्वीच्याया चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली. परंतु चित्रपटाचे भविष्य दुसऱ्या दिवसाच्या वाढीवर अवलंबून असेल. अहवालांनुसार "धुरंधर" ने दुसऱ्या दिवशी ३३ कोटी ते ३५ कोटी  रुपयांची कमाई केली. ही त्याच्या दुसऱ्या दिवशी २०% वाढ झाली. दोन दिवसांतच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० कोटींचा टप्पा ओलांडला. "धुरंधर" चे एकूण निव्वळ कलेक्शन अंदाजे ६२ कोटी आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number