एसटी कर्मचाऱ्यांचा संप फोडण्याचा प्रयत्न राज्य सरकरडून सुरु असल्याचा आरोप होत आहे. शेकडो कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटीस दाखल करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी कर्मचारी पुन्हा कामावर परत रुजू झाल आहेत. त्यातच धुळे येथे एसटी बस सुरू करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाच्या अंगलट आला आहे. बस सुरु झाल्यावर अज्ञात लोकांनी एसटीच्या ३ बसवर दगडफेक केली. मात्र दगडफेक करणाऱ्यांविरोधात पोलिसांत अद्याप तक्रार दाखल झालेली नाही.
एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनी करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडी अनेक चर्चा घेत आहे. महाविकास आघाडीचे पुढचे पाऊल हे महाधिवक्त्यांच्या सल्ल्यानुसार घेणार असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.
महाधिवक्तासोबत चर्चा करून एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीवर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन अनिल परब यांनी संपकारी प्रतिनिधींना दिले आहे.