धुळ्यात आयकर विभागाची कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरूच

जय महाराष्ट्र न्यूज, धुळे आयकर विभागाने धुळे, शिरपूरमध्ये आपला तळचं ठोकला असल्याचे दिसतंय. कालपासून सुरू झालेली प्राप्तीकर विभागाची कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. धुळ्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या निवासस्थानी तसेच, शिरपूरमध्ये काँग्रेसचे माजी शिक्षणमंत्री तथा विद्यमान विधानपरिषद सदस्य अमरीश पटेल हे भागीदार असलेल्या व्यापारी प्रतिष्ठान कंपन्यांची आयकर विभागातर्फे चौकशी […]

धुळ्यात आयकर विभागाची कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरूच

जय महाराष्ट्र न्यूज, धुळे

आयकर विभागाने धुळे, शिरपूरमध्ये आपला तळचं ठोकला असल्याचे दिसतंय. कालपासून सुरू झालेली प्राप्तीकर विभागाची कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.

धुळ्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या निवासस्थानी तसेच, शिरपूरमध्ये काँग्रेसचे माजी शिक्षणमंत्री तथा विद्यमान विधानपरिषद सदस्य अमरीश पटेल हे भागीदार असलेल्या व्यापारी प्रतिष्ठान कंपन्यांची आयकर विभागातर्फे चौकशी सुरूच आहे.

मात्र, आतापर्यंत झालेल्या तपासणीत नेमकं काय निष्पन्न झालं यासंदर्भातील माहिती उपलब्ध झालेली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number