जय महाराष्ट्र न्यूज ,धुळे
धुळ्यातील कुख्यात गुंड्याच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपीला पुण्यातील कामशेत जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी धुळ्यात एका कुख्यात गुंड्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर सागर साहेबराव पवार उर्फ कट्टी या मुख्य आरोपीला पुण्यातील कामशेत येथून अटक करण्यात यश आले आहे.
हत्येमागचा हेतू अद्याप अस्पष्ट असून इतर आरोपींचा तपास सुरु आहे.