मंत्रालयासमोर शेतकऱ्याचा विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   धुळ्यातील शेतकरी धर्मा मांगा पाटील यांनी सोमवारी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या समोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. धर्मा पाटील यांना सेंट जॉज् रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. जय महाराष्ट्रला माहिती देताना धर्मा पाटील यांच्या पुत्र नरेंद्र धर्मा पाटील यांनी माहिती दिली की धुळे जिल्ह्यात त्याच्या मालकीची 5 एकर बागायदार […]

मंत्रालयासमोर शेतकऱ्याचा विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

धुळ्यातील शेतकरी धर्मा मांगा पाटील यांनी सोमवारी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या समोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

धर्मा पाटील यांना सेंट जॉज् रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. जय महाराष्ट्रला माहिती देताना धर्मा पाटील यांच्या पुत्र नरेंद्र धर्मा पाटील यांनी माहिती दिली की धुळे जिल्ह्यात त्याच्या मालकीची 5 एकर बागायदार शेती होती, सोलर प्रोजेक्टसाठी राज्य सरकारने ताब्यात घेतली, मात्र मोबदला मिळाला नाही.

यासंदर्भात अनेक मंत्र्यांना विनंती करुन झाले मात्र काहीही हाती लागले नाही त्यामुळे वडिलांनी मंत्रालयामध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number