जय महाराष्ट्र न्यूज, वेब टीम
‘सेल्फी मैने ले ली आज’, ‘दिलों का शूटर है मेरा स्कूटर’, ‘बापू दे दे थोडा कॅश’ अशा ढिंच्यॅक गाण्यांनी सोशल मिडियावर धुमाकुळ घालणारी ढिंच्यॅक पूजा तुम्हाला माहितच असेल.
या गाण्यांनी ढिंच्यॅक पूजाला चांगलीच लोकप्रियता मिळवुन दिली.
तिच्या व्हिडियोजला मिळणाऱ्या लाईक्स,कमेंट्स आणि सबस्कायबर्सची संख्या मोजावी तितकी कमीच आहे .
आणि म्हणुनच बिग बॉस या रिअॅलिटी शोनेदेखील सोशल मीडिया क्वीन ढिंच्यॅक पूजाला यावर्षीच्या सिझनमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिलं होतं.
मात्र; पूजाने या शोमध्ये सहभागी होण्याकरीता जवळजवळ 80 लाख रुपयांची मागणी केल्याचं समजतंय.
बिग बॉस या रिअॅलिटी शोचं सिझन सुरु होण्याआधीपासूनच त्याच्याविषयी चर्चा रंगायला सुरुवात होते.
यावर्षीच्या सिझनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी भाग घेणर? याबाबत चाहत्यांकडुन अनेक तर्क बांधले जातात.
यावर्षिच्या शोसाठी पूजाला आमंत्रण गेलं होतं. मात्र; पूजाने केलेल्या 80 लाखाची मागणी निर्मात्याला न रुचल्यमुळे बोलणी फिस्कटली.
आणि म्हणुनच पूजाने नकार दिल्याचे समजते.
दरवर्षिप्रमाणे यावर्षिदेखील बॉलिवूडचा दबंग खानच या शोचं सूत्रसंचालन करणार असल्याचं नक्की झालंय.
मात्र; पूजाने दिलेल्या नकारानंतर कोणकोणते सेलिब्रिटी या सिझनमध्ये सहभागी होणार, याची उत्सुकता आता सर्वच प्रेक्षकांना लागली आहे.