२२ सप्टेंबर, २०२४, मुंबई : धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (एस.टी.) दर्जा मिळावा या मागणीसाठी महाराष्ट्रातील धनगर समाजाने पंढरपूर येथे आंदोलन केले. यावर 'शिंदे समिताचा अहवाल आल्यानंतर तात्काळ शासन निर्णय काढू' असे लिखित आश्वासन शासनाकडून देण्यात आले. पण या शासनाच्या निर्णयाला जनजाती कल्याण आश्रम विरोध करत आहे.
'भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 342 नुसार प्रसिद्ध केलेल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आदेश (सुधारणा) कायदा नुसार कोणत्याही आदेशात धनगर हा शब्द प्रयोग केलेला नाही.तसेच मा.उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी या संदर्भातील फेटाळलेल्या याचिका या सर्वच बाबी लक्षात घेता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आदेश (सुधारणा) कायदा नुसार आपणास अनुसूचित जमातीच्या यादीत फेरफार करण्याचा कोणताही अधिकार नसताना केवळ आणि केवळ राजकीय स्वार्थासाठी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण असा कोणताही GR काढू नये त्यास आदिवासी समाजाचा संविधानिक विरोध आहे.' असे जनजाती कल्याण आश्रमाचे म्हणणे आहे.