जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
धनगर समाजासाठी एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सांगलीत धनगर समाजाकडून विठ्ठलाला साकडं घालण्यात आले.
भाजप सरकारने तात्काळ आरक्षण देण्याचा शब्द पाळला नसल्याने घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.
तसेच सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास पंढरपूर ते बारामती पदयात्रा काढून आंदोलनाचा इशारा धनगर आरक्षण सेनेचे अध्यक्ष नवनाथ पडळकर यांनी
मुख्यमंत्र्यांना दिला.