जय महाराष्ट्र न्यूज, लातूर
धनगर आरक्षणाचा विषय मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर आदिवासी धनगर साहित्य संमेलनात ठराव घेण्यात येणार आहे.
जर सरकारने हा विषय मार्गी नाही लावला तर आम्ही सरकारच्या विरोधात भूमिका घेऊ त्याबरोबरच आपलं आरक्षण हे कोर्टात देखील टिकलं पाहिजे व तो प्रश्न सोडवण्यासाठी आपलं आंदोलन, सहकार्य ठेऊन सरकारवर प्रेशर देण्याची गरज असल्याचं मत देखील जल संधारण मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केलय.
ते लातूर येथे आयोजित दुसऱ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनात बोलत होते. ते पुढे असे म्हणाले कि कायदेशीर बाबीची पूर्तता करावी मी तर सरकारमध्ये आहेच आपण प्रयत्न करायला हवे असेही ते म्हणाले.