जय महाराष्ट्र न्यूज, अकोला
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे राज्यभर आंदोलन सुरू असतानाच आता धनगर समाजही आक्रमक होताना दिसत आहे. अकोला येथे धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल जागर आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी पारंपरिक वाद्य वाजवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
भाजप सरकारला सत्तेत येऊन चार वर्षे झाली आहेत. मात्र धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत हे सरकार टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी ‘ढोल बजाव’ आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. यावेळी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
धनगर समाजाच्या मागण्या –