जय महाराष्ट्र न्यूज, बारामती
राज्यातील सत्तर टक्के भागात पावसा अभावी दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली असली तरी सरकार दुष्काळ घोषीत करत नाही असा घणाघाती आरोप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला.
बारामतीतल एका कार्यक्रमात बोलताना मुंडे यांनी सरकारवर चांगलीच टीका केली. दरम्यान, सरकार शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत गंभीर नाही. यामुळे सरकारची संकुचीत वृत्ती दिसते. तर यंदाच्या अधिवेशनात तीन मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघडकीस आणून देखील मुख्यमंत्री याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे लवकरच याविरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला.