जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस विरोधकांच्या आक्रमक पावित्र्यानं गाजला. सकाळचं सत्र मिहान प्रकल्प आणि इतर मुद्दयांनी गाजलं. त्यानंतर कामकाज तहकुब करण्यात आलं. त्यानंतर दुपारी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंनी सरकारवर तोफ डागली. अधिक आक्रमक होत त्यांनी सरसकट कर्जमाफीचा मुद्दा लाऊन धरला आणि सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस विरोधकांच्या आक्रमक पावित्र्यानं गाजला. सकाळचं सत्र मिहान प्रकल्प आणि इतर मुद्दयांनी गाजलं. त्यानंतर कामकाज तहकुब करण्यात आलं.
त्यानंतर दुपारी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंनी सरकारवर तोफ डागली. अधिक आक्रमक होत त्यांनी सरसकट कर्जमाफीचा मुद्दा लाऊन धरला आणि सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.