धनंजय मुंडेंनी वाचवले अपघातग्रस्ताचे प्राण

जय महाराष्ट्र न्यूज, उस्मानाबाद   विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एका अपघात ग्रस्ताचे प्राण वाचवले आहेत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास कळंब ढोकी रस्त्यावर पिंपळगाव वाटी जवळ एका मोटारसायकलला अपघात झाला. या अपघातात उस्मान शेख निपाणी हा 45 वर्षीय व्यक्ती जखमी होऊन रस्त्यावर पडला होता. त्याचवेळी कळंबहुन उस्मानाबाद कडे जात असलेल्या धनंजय मुंडे यांनी रस्त्यावरील […]

धनंजय मुंडेंनी वाचवले अपघातग्रस्ताचे प्राण

जय महाराष्ट्र न्यूज, उस्मानाबाद

 

विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एका अपघात ग्रस्ताचे प्राण वाचवले आहेत.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास कळंब ढोकी रस्त्यावर पिंपळगाव वाटी जवळ एका मोटारसायकलला अपघात झाला. या अपघातात उस्मान शेख निपाणी हा 45 वर्षीय व्यक्ती जखमी होऊन रस्त्यावर पडला होता.

त्याचवेळी कळंबहुन उस्मानाबाद कडे जात असलेल्या धनंजय मुंडे यांनी रस्त्यावरील या जखमी व्यक्तीस पाहून गाडी थांबवली. स्वतः खाली उतरून त्या जखमी व्यक्तीची पाहणी केली.

सोबतच्या पोलिस बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस गाडीमधून तातडीने जखमीस उस्मानाबादच्या रुग्णालयात रवाना केले.

उस्मानाबादच्या रुग्णालयातील डॉक्टरांनाही रूग्णाची काळजी घेण्याची सूचना देऊन ते उस्मानाबादकडे रवाना झाले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number