धनंजय मुंडेचा सरकारवर आणखी एका मोठ्या घोटाळ्याचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   बीटी बियाणाला बोंड अळी दाद देत नाही. त्यामुळे त्यातून शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते असा स्पष्ट अहवाल केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने डिसेंबर 2015 मध्ये शासनाला दिला होता. हा अहवाल शासनाने जाणीवपूर्वक दडपला, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय. या अहवालाकडे सरकारने दुर्लक्ष केले. यामुळे कोणत्याच उपाययोजना झाल्या […]

धनंजय मुंडेचा सरकारवर आणखी एका मोठ्या घोटाळ्याचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बीटी बियाणाला बोंड अळी दाद देत नाही. त्यामुळे त्यातून शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते असा स्पष्ट अहवाल केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने डिसेंबर 2015 मध्ये शासनाला दिला होता.

हा अहवाल शासनाने जाणीवपूर्वक दडपला, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय. या अहवालाकडे सरकारने दुर्लक्ष केले. यामुळे कोणत्याच उपाययोजना झाल्या नाहीत.

म्हणूनच बिटी बियाण्यावरील प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले. सरकारनेच शेतकऱ्यावर हे संकट आले. यामुळे हा एक मोठा कॉटन सीड स्कॅम असून त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही मुंडे यांनी केलीय.

याआधी बीटी बियाणांच्या बाबत सखोलपणे अडचणी आणि त्यातील त्रुटीही सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. याच पत्राची एक प्रत मुंडे यांनी मुख्यमंत्र्यासोबतच कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनाही पाठवली होती. मात्र, त्याची दखल घेतली नाही असे मुंडेंचं म्हणणे आहे.

“धनंजय मुंडे अपुऱ्या माहितीवर आरोप करत आहेत” असं वक्तव्य  पांडुरंग फुंडकरांनी केलंय. तसेच आम्ही संबिधित कंपनीवर गुन्हे दाखल केलेत असंही पांडूरंग फुंडकर म्हणालेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number